बगदाद – अमेरिका आणि इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांमधील संघर्ष वाढू लागला आहे. गेल्या चोवीस तासात इराणसंलग्न दहशतवाद्यांनी इराकमधील अमेरिकेच्या हवाईतळ आणि दूतावासावर हल्ले चढविले. गेल्या महिन्यात अमेरिकेने इराक व सिरियातील इराणसंलग्न गटांवर केलेल्या कारवाईचा सूड म्हणून हे हल्ले चढविले असून येत्या काळात यांचे प्रमाण वाढेल, अशी धमकी या गटांनी दिली. दरम्यान, अमेरिकी हितसंबंधांवर ड्रोन हल्ले चढविणार्यांची माहिती देणार्यांना तीस लाख डॉलर्स ईनाम देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.
अमेरिका आणि मित्रदेशांचे लष्कर तैनात असलेल्या इराकमधील एन अल-असाद हवाईतळावर सोमवारी दुपारी रॉकेट हल्ले झाले. एकूण सात रॉकेट्चा मारा या हवाईतळाच्या दिशेने करण्यात आला होता. पण यातील तीन रॉकेट्स हवाईतळाच्या आवारात कोसळले. यानंतर सोमवारी मध्यरात्रीनंतर राजधानी बगदाद येथील अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/two-attacks-on-us-bases-in-iraq-in-12-hours/