लंडन/कॅनबेरा/बीजिंग – चीन व्यापाराचा सामरिक शस्त्रासारखा वापर करीत असल्याचा इशारा ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी दिला. चीन हा धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा स्पर्धक असून ‘सोव्हिएत युनियन’पेक्षा अधिक घातक असल्याचेही अॅबॉट यांनी बजावले. ब्रिटनने अॅबॉट यांची विशेष व्यापार सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून, ब्रिटन व सहकारी देशांनी व्यापाराच्या मुद्यावर चीनपासून सावधगिरी बाळगावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
टोनी अॅबॉट 2013 ते 2015 असे दोन वर्षे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते. याच कालावधीत ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये व्यापारी करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या व्यापारी कराराचा वापर चीनने ऑस्ट्रेलियावरील आपली पकड घट्ट करण्यासाठी केल्याचे कालांतराने समोर आले होते. याच व्यापारी प्रभावाचा वापर करुन चीन सध्या ऑस्ट्रेलियाला धमकावण्याचा व दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान अॅबॉट यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/china-is-using-trade-as-weapon/