वॉशिंग्टन/लंडन – अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि इतर प्रमुख शहरांचा ताबा घेण्याच्या तयारीत असलेल्या तालिबानला रोखण्यासाठी अमेरिकेने ‘बी-५२’ बॉम्बर आणि ‘एस-१३० स्पेक्टर’ गनशिप विमाने रवाना केली आहेत. कंदहार, हेरात आणि लश्करगह येथील हवाई कारवाईत अमेरिकेची ही विमाने सहभागी असल्याचे ब्रिटनच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले.
गेल्या महिन्याभरात अमेरिकेच्या विमानांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या ठिकाणांवर हल्ले चढविल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर तैनात ही विमाने अफगाणिस्तानात कारवाई करीत असल्याचे, ब्रिटनच्या वर्तमानपत्राने अमेरिकेच्या लष्करी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/us-has-sent-bombers-and-gunners-to-afghanistan/