तैवानला साथ दिल्यास अमेरिका व ऑस्ट्रेलियाविरोधात चीन महासंग्राम छेडेल

- चीनच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी धमकावले

महासंग्राम

बीजिंग/वॉशिंग्टन/कॅनबेरा – चीन-तैवान संघर्षात अमेरिका व ऑस्ट्रेलियाने तैवानला साथ दिल्यास चीन त्यांच्याविरोधात महासंग्राम छेडेल, अशी धमकी चीनच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांनी दिली. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’नेही तैवानच्या मुद्यावरून नवा इशारा दिला असून ऑस्ट्रेलियाने आपल्या जवानांचा त्याग करायची तयारी ठेवावी, असे बजावले आहे. चीनकडून आलेल्या या धमक्या तैेवान मुद्यावरून कम्युनिस्ट राजवटीची वाढती आक्रमकता दाखवून देणार्‍या ठरतात.

गेल्याच महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. ‘तैवानचे स्वातंत्र्य व विघटनवाद हा चीनला नवचैतन्य मिळवून देण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. चीनचे एकत्रीकरण वास्तवात उतरणार असून ते शांततापूर्ण मार्गाने घडविणे तैवानी जनतेच्या हिताचे असेल’, असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला होता. त्यानंतर चीनची प्रसारमाध्यमे तसेच संरक्षणदले आक्रमक झाली असून सातत्याने तैवानला धमकाविण्यात येत आहे.

महासंग्राम

‘चीन व तैवानच्या विलिनीकरणात अडथळे आणणारे अपयशीच ठरणार आहेत. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने तैवानच्या लिनीकरणासाठी सुरू केलेल्या मोहिमेत अमेरिका व ऑस्ट्रेलियाने खोडा घातल्यास त्याचे अतिशय वाईट परिणाम होऊ शकतात. चीन व अमेरिकेदरम्यान युद्धही भडकू शकते. या युद्धावर कोणाचेच नियंत्रण राहणार नाही व त्याचे रुपांतर महासंग्रामात होईल’, अशी धमकी चीनचे माजी राजनैतिक अधिकारी व्हिक्टर गाओ यांनी दिली. गाओ हे चीनच्या राजवटीने स्थापन केलेल्या अभ्यासगटाचे प्रमुख असून यापूर्वी महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळी आहे.

महासंग्राम

गाओ यांच्यापाठोपाठ चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’नेही तैवानच्या मुद्यावरून धमकविण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. चीन व तैवानमधील संबंधात ऑस्ट्रेलियाच्या लष्कराने हस्तक्षेपाचा प्रयत्न केला तर त्यांनी त्यांच्या जवानांचा त्याग करण्याची तयारी ठेवावी, असे ‘ग्लोबल टाईम्स’चे संपादक हु शिजिन यांनी बजावले. ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी नुकतेच, तैवान संघर्षात अमेरिका उतरल्यास ऑस्ट्रेलियाची संरक्षणदलेही मागे राहणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्यावर शिजिन यांच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info