रशिया-युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून पोलंडमध्ये नव्या लष्करी तैनातीला सुरुवात

लष्करी तैनातीला सुरुवात

वॉर्सा/वॉशिंग्टन – रशिया व युक्रेनमधील तणाव वाढत असतानाच अमेरिकेने पोलंडमध्ये नव्या लष्करी तैनातीला सुरुवात केली आहे. पोलंडमध्ये अमेरिकेच्या लष्करी तुकडीसह सशस्त्र वाहने दाखल झाल्याची माहिती पोलंडमधील सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेची पोलंडमधील तैनाती सुरू असतानाच रशियाच्या ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’नी बेलारुसमध्ये गस्त घातल्याचे समोर आले आहे.

रशिया व युक्रेन सीमाभागात लष्करी तैनातीबाबत सातत्याने नवनवीन दावे समोर येत आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाला रोखण्यासाठी जोरदार राजनैतिक प्रयत्नही सुरू आहेत. अमेरिका, नाटो व रशियामध्ये आतापर्यंत झालेल्या राजनैतिक चर्चांमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. दोन्ही बाजू राजनैतिक पातळीवरील चर्चा चालू ठेवण्याचे संकेत देत आहेत.

लष्करी तैनातीला सुरुवात

असे असतानाच गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युरोपातील सैन्यतैनातीबाबत घोषणा केली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युरोपिय देशांमध्ये तीन हजार अतिरिक्त जवान तैनात करण्याचा निर्णय घेतल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. जर्मनी, पोलंड व रोमानिया या तीन देशांमध्ये हे अतिरिक्त जवान तैनात होणार आहेत. या निर्णयापूर्वी अमेरिकेने युरोपात तैनात असणार्‍या लष्करी तुकड्यांपैकी साडेआठ हजार जवानांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

लष्करी तैनातीला सुरुवात

शनिवारी पोलंडमध्ये दाखल झालेली शस्त्रसामुग्री तसेच लष्करी तुकडी बायडेन यांच्या घोषणेचा भाग असल्याचे सांगण्यात येते. पोलंडपूर्वी जर्मनीतही अमेरिकेच्या नव्या लष्करी तुकड्या दाखल झाल्या आहेत. त्याचवेळी जर्मनीत सध्या तैनात असलेल्या अमेरिकी लष्कराची तुकडी रोमानियात तैनात करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत, असे अमेरिकी सूत्रांकडून सांगण्यात आले.

अमेरिकेच्या या नव्या सैन्यतैनातीमुळे रशिया व युक्रेनमधील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. रशियाने बेलारुसच्या युक्रेन सीमेनजिक हजारो जवान तैनात केल्याचे दावे समोर आले आहेत. त्यापाठोपाठ रशियाच्या न्यूक्लिअर बॉम्बर्सनीही बेलारुसला भेट दिल्याचे समोर येत आहे. अमेरिकेची युरोपमधील नवी तैनाती विध्वंसकारी पाऊल असल्याची टीका रशियाने यापूर्वीच केली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info