‘थर्मोन्यूक्लिअर वेपन’ प्रदर्शित करून रशियाचा पाश्चिमात्यांना नवा आण्विक इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – दुसऱ्या महायुद्धात रशियाने नाझीवादी जर्मनीवर मिळविलेल्या विजयाचा व्हिक्टरी डे रशिया 9 मे रोजी साजरा करणार आहे. राजधानी मॉस्कोमध्ये रशियन संरक्षणदलांच्या भव्य संचलनाचा सराव सुरू आहे. मात्र या सरावात रशियाने भयंकर नरसंहार घडवून शकणारे ‘थर्मोन्यूक्लिअर वेपन’ प्रदर्शित करून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हादवून सोडले. ही भयंकर बाब ठरते, अशी टीका अमेरिकेने सुरू केली आहे. तर नाटोच्या सध्याच्या नेतृत्त्वाला अणुयुद्धाच्या गंभीर्याची जाणीवच नसल्याची टीका अमेरिकेतील रशियाच्या राजदूतांनी केली आहे. तरीही रशिया सहमती होऊन अणुयुद्ध टाळण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करीत राहिल, असा संदेश रशियाचे राजदूत ॲन्तोनी अनातोव्ह यांनी दिला.

‘थर्मोन्यूक्लिअर वेपन'

युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, अमेरिका व नाटोचे इतर सदस्यदेश युक्रेनला पूर्ण लष्करी सहकार्य करीत आहेत. अमेरिका आता या युद्धात पूर्णपणे सहभागी झाल्याचे आरोप रशिया करीत आहे. रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनला साथ देण्यासाठी 30 अब्ज डॉलर्सची अतिरिक्त तरतूद करण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे. मात्र युक्रेनचे युद्ध चिघळले तर त्याचे पर्यावसन अणुयुद्धात होईल, याची जाणीव रशियन नेते सातत्याने करून देत आहेत. काही दिवसांपूर्वी, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी तसा सुस्पष्ट इशारा दिला होता.

मात्र रशिया आण्विक ब्लॅकमेल करीत असल्याचे सांगून अमेरिका व नाटोच्या इतर सदस्यदेशांनी यासाठी रशियाला धारेवर धरले आहे. रशियाविरोधी प्रचाराचा मुद्दा म्हणून अमेरिका व नाटोचे सदस्यदेश या अणुयुद्धाच्या इशाऱ्याचा वापर करीत आहेत. अशा परिस्थितीत रशियाने आपण दिलेली धमकी पोकळ नाही, याची जाणीव अमेरिका व नाटोला करून दिली. 9 मे रोजी होणाऱ्या व्हिक्टरी डेच्या संचलनासाठी सुरू असलेल्या सरावात रशियाने थर्मोन्यूक्लिअर वेपन प्रदर्शित केले. याची दखल पाश्चिमात्य माध्यमांना घ्यावी लागली असून याचे फार मोठे पडसाद युरोपिय देशांमध्ये उमटतील, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

‘थर्मोन्यूक्लिअर वेपन'

या पार्श्वभूमीवर, रशियाचे अमेरिकेतील राजदूत अनातोव्ह यांनी नाटोच्या सध्याच्या राजकीय नेतृत्त्वाकडे अणुयुद्धाचे गांभीर्य जाणून घेण्याची कुवतच नसल्याचा ठपका ठेवला. अणुयुद्धात कुणीही विजयी ठरू शकत नाही, हे आम्ही अमेरिकेला पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. अणुयुद्ध टाळण्यासाठी यापुढेही रशियाचे प्रयत्न सुरू राहतील, असे रशियन राजदूत पुढे म्हणाले.

थर्मोन्यूक्लिअर वेपन प्रदर्शित करून रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चिमात्यांचा थरकाप उडविणारा इशारा दिलेला आहे, असे दावे माध्यमे करू लागली आहेत. युरोपिय देशांवर रशियाच्या या आण्विक इशाऱ्याचा फार मोठा परिणाम अपेक्षित आहे. आत्तापर्यंत राजकीय व आर्थिक पातळीवरील असहाय्यतेपोटी अमेरिकेच्या युक्रेनबाबतच्याधोरणाला पाठिंबा देणारे युरोपिय देश देखील अणुयुद्धाच्या चिंतेने आपली भूमिका बदलू शकतील. म्हणूनच रशियाकडून आलेले हे अणुयुद्धाचे इशारे दुर्लक्षित करण्याचे धोरण अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने स्वीकारले होते. पण याबाबत रशिया उघडपणे देत असलेले हे इशारे आता बायडेन प्रशासनासह अमेरिकेच्या निकटतम सहकारी देशांनाही दुर्लक्षित करता येणार नाहीत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info