रशियाच्या ताब्यातील भाग मिळविण्यासाठी युक्रेनकडे फारसा अवधी राहिलेला नाही

- अमेरिकेच्या संसद सदस्यांचा इशारा

भाग

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – युक्रेनमधील रशियाच्या नियंत्रणाखाली असलेला भाग युक्रेनला पुन्हा ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे काही आठवड्यांचाच कालावधी शिल्लक आहे, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ संसद सदस्य ॲडम स्मिथ यांनी दिला. हिवाळा सुरू झाल्यावर युद्धाचे पारडे रशियासाठी हितकारक ठरेल, असेही स्मिथ यांनी बजावले. स्मिथ यांच्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनी लष्कराचे मनोधैर्य खचत असल्याचे वृत्त अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने दिले आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनने रशियाने ताबा मिळविलेल्या काही भागांवर प्रतिहल्ले चालू केले होते. यात युक्रेनला काही प्रमाणात यशही मिळाल्याचे दावे केले जातात. मात्र मोठे यश हवे असेल तर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, प्रगत लढाऊ विमाने यांच्यासह ‘हेवी वेपनरी’ची गरज असल्याचे युक्रेनी अधिकारी वारंवार सांगत आहेत. मात्र ब्रिटन वगळता पाश्चिमात्यांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संसद सदस्यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

भाग

‘युक्रेनी लष्कराला युद्धाचे पारडे फिरविण्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे व ड्रोन्सची गरज आहे. हिवाळा सुरू झाल्यावर दोन्ही देशांमध्ये कोण सर्वाधिक काळ टिकाव धरतो, याची स्पर्धा लागेल व त्याचा फायदा रशियाला होण्याची शक्यता आहे. युक्रेनला आता सर्वाधिक सहाय्याची गरज आहे. पुढचे तीन ते सहा आठवडे युक्रेनसाठी निर्णायक ठरतील’, असा इशारा स्मिथ यांनी दिला. स्मिथ यांनी गेल्याच आठवड्यात उच्चस्तरीय शिष्टमंडळासह युक्रेनला भेट दिली होती. त्यामुळे त्यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

भाग

युक्रेन रशियाबरोबर शांतीकरारासाठी इच्छुक आहे, पण त्यापूर्वी त्यांना रशियाच्या ताब्यातील काही भाग परत मिळवायचा आहे, असा दावाही अमेरिकी सदस्यांनी केला. सध्या डोन्बास क्षेत्रातील लुहान्स्क प्रांतावर रशियाचे पूर्ण नियंत्रण आहे. त्याव्यतिरिक्त डोनेत्स्क प्रांतातील 50 टक्क्यांहून अधिक भाग रशियाच्या ताब्यात आहे. दक्षिण युक्रेनमधील खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतातील 70 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर रशियाने ेनियंत्रण मिळविले आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने युक्रेनी लष्कराचे मनोधैर्य खचत चालल्याचे वृत्त दिले आहे. पाच महिन्यांच्या दीर्घ संघर्षानंतर युक्रेनी लष्करातील एकजूट विस्कळीत होऊ लागल्याचे अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info