रशियाकडून दक्षिण युक्रेन व डोन्बासमध्ये मोठे हल्ले

- खेर्सनमधील रशियाचे 100हून अधिक जवान मारल्याचा युक्रेनचा दावा

मोठे हल्ले

मॉस्को/किव्ह – रशियाने युक्रेनच्या दक्षिण तसेच पूर्व भागात मोठे हल्ले चढविले आहेत. दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह या बंदरावर केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील आघाडीच्या उद्योजकाचा बळी गेला. तर डोन्बासमध्ये रशियाने केलेल्या जबरदस्त माऱ्यानंतर राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी स्थानिक नागरिकांना बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी खेर्सनमध्ये युक्रेनने चढविलेल्या हल्ल्यात रशियाचे 100हून अधिक जवान मारले गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला.

युक्रेनमधील रशियाच्या नियंत्रणाखाली असलेला भाग युक्रेनला पुन्हा ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे काही आठवड्यांचाच कालावधी शिल्लक आहे, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ संसद सदस्यांनी नुकताच दिला होता. त्याचवेळी युक्रेनी लष्कराचे मनोधैर्य खचत असल्याचे वृत्तही अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने दिले होते. तर रशियाकडील शस्त्रसाठा संपत आल्याचे दावेही काही परदेशी यंत्रणा व माध्यमांनी केले होते. या पार्श्वभूमीवर रशियन फौजांकडून वाडणारी हल्ल्यांची तीव्रता लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

मोठे हल्ले

गेल्या आठवड्यात युक्रेनच्या फौजांनी दक्षिणेकडील खेर्सनमध्ये एकापाठोपाठ एक मोठे हल्ले केले होते. शुक्रवारी युक्रेनी लष्कराने या प्रांतातील बेरिस्लाव भागात मोठा हल्ला चढविला. या हल्ल्यात रशियाचे 100 हून अधिक जवान ठार झाले असून सात रणगाडे नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केला. ही फक्त सुरुवात असून पुढील काही दिवसांमध्ये युक्रेन अजून मोठे हल्ले करून भाग ताब्यात घेईल, असे युक्रेनच्या सदर्न कमांडकडून सांगण्यात आले. खेर्सनपाठोपाठ युक्रेनने रशियाच्या क्रिमिआ प्रांतातही ड्रोन हल्ले चढविल्याची माहिती समोर आली आहे.

मोठे हल्ले

हे हल्ले वगळता इतर क्षेत्रात मात्र युक्रेनला रशियाचा जबर मारा सहन करावा लागत असल्याचे उघड होत आहे. दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह बंदर तसेच नजिकच्या परिसरात रशियाने जोरदार क्षेपणास्त्र व रॉकेटहल्ले चढविले. मायकोलव्हमध्ये केलेल्या क्षेपणास्त्रहल्ल्यांमध्ये युक्रेनमधील आघाडीचे उद्योजक ओलेक्सी वॅडाटर्स्कि यांचा बळी गेला. ओलेक्सी हे युक्रेनच्या शेती क्षेत्रातील मोठे व्यापारी असून अन्नधान्याच्या निर्यातीतील आघाडीचे नाव होते. त्यांना ‘हिरो ऑफ युक्रेन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. युक्रेनमधून अन्नधान्याच्या निर्यातीला परवानगी मिळत असतानाच त्यांचा बळी जाणे युक्रेनसाठी मोठा धक्का ठरतो.

रशियाने डोनेत्स्क भागातही मोठे हवाईहल्ले चढविले असून रणगाडे व तोफांचा मारा सुरू ठेवला आहे. बाखमत व स्लोव्हिआन्स्क या दोन शहरांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 28 ते 30 जुलै या तीन दिवसात डोनेत्स्क तसेच खार्किव्ह भागात रशियन फौजांनी केलेल्या हल्ल्यात युक्रेनी लष्कराच्या स्पेशल युनिट्सच्या सुमारे 300 जवानांचा बळी गेल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली.

English हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info