युक्रेनने आपल्या जवानांवर विषप्रयोग घडविल्याचा रशियाचा आरोप

मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या राजवटीने झॅपोरिझ्झिआमधील रशियन जवानांवर विषप्रयोग केल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण विभागाने केला. गेल्या महिन्याच्या अखेरीस प्रांतातील अनेक जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व त्यांच्या तपासणीत ‘बोटुलिनिअम’ हे विषारी रसायन आढळले होते, असे संरक्षण विभागाने आपल्या आरोपात म्हटले आहे. या विषप्रयोगाचे पुरावे व संबंधित माहिती आंतरराष्ट्रीय यंत्रणेकडे सोपविण्यात येईल, असेही रशियाने स्पष्ट केले. दरम्यान, क्रिमिआ प्रांतातील नौदल मुख्यालयावर झ्ाालेला ड्रोन हल्ला उधळल्याची माहिती रशियाने दिली. गेल्या काही दिवसात क्रिमिआतील रशियन तळांवर तीन मोठे हल्ले झ्ााले होते.

विषप्रयोग

गेल्या महिन्यात युक्रेनी लष्कराने रशियन फौजांविरोधात प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू केली होती. या प्रतिहल्ल्यांमध्ये खेर्सन, झ्ॉपोरिझ्ािआ या प्रांतांसह क्रिमिआलाही लक्ष्य केले आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये क्रिमिआ प्रांतातील तीन तळांवर हल्ले करून युक्रेनने रशियन लष्कराचे मोठे नुकसान घडविले. त्यानंतर शनिवारी सेव्हॅस्टोपोल शहरातील ‘ब्लॅक सी फ्लीट’च्या मुख्यालयावर ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. रशियाने ड्रोन्स उद्ध्वस्त करून हा हल्ला उधळून लावला. क्रिमिआतील हे वाढते हल्ले रशियाच्या चिंता वाढविणारे असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे व विश्लेषकांनी केला.

क्रिमिआतील हल्ला उधळल्याचे समोर येत असतानाच रशियाने युक्रेनवर विषप्रयोगाचा आरोप केला आहे. झ्ॉपोरिझ्ािआ प्रांतातील रशियन जवानांवर हा विषप्रयोग झ्ााल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले. मात्र विषप्रयोग नक्की कशातून झ्ााला हे समोर आलेले नाही. युक्रेनने आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. उलट रशियन जवानांनी मुदत उलटून गेलेले डबाबंद मास खाल्याने विषबाधा झ्ााली असावी, असे उत्तर दिले.

दरम्यान, रशियाने ब्लॅक सी सागरी क्षेत्रातील युद्धनौकांची तैनाती वाढविल्याचे समोर आले. मिसाईल कॅरिअर्स, लँडिंग शिप्स व विनाशिकांसह 15 युद्धनौका या क्षेत्रात तैनात करण्यात आल्या आहेत. यातील काही युद्धनौकांवर कॅलिबर क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. झ्ॉपोरिझ्ािआ, खेर्सन, क्रिमिआसह बेलगोरोदमध्ये होणाऱ्या वाढत्या युक्रेनी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तैनाती वाढविल्याचे सांगण्यात येते.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झ्ोलेन्स्की यांनी, युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी रशिया मोठे हल्ले चढवू शकतो असा इशारा दिला. बुधवारी 24 ऑगस्टला युक्रेनचा स्वातंत्र्यदिन आहे. या पार्श्वभूमीवर रशिया मोठे हल्ले चढवून भीतीचे वातावरण निर्माण करेल, असे राष्ट्राध्यक्ष झ्ोलेन्स्की यांनी बजावले. झ्ोलेन्स्की हा इशारा देत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, झ्ॉपोरिझ्ािआमधील अणुऊर्जा प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या पथकाला परवानगी दिली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर झ्ाालेल्या चर्चेनंतर ही माहिती जाहीर करण्यात आली.

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सल्लागाराच्या मुलीचा बॉम्बहल्ल्यात मृत्यू

मॉस्को/किव्ह – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सल्लागार अलेक्झ्ाांडर दुगिन यांची मुलगी दारिआ दुगिन हिचा बॉम्बस्फोटात मृत्यू झ्ााला. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शनिवारी रात्री दारिआच्या गाडीत स्फोट घडविण्यात आला. हल्ल्याचे खरे लक्ष्य तिचे वडील अलेक्झ्ाांडरच होते, असे सांगण्यात येते.

शनिवारी रात्री एका सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दारिआ व तिचे वडील अलेक्झ्ाांडर घरी परतण्यासाठी निघाले होते. अलेक्झ्ाांडर दुगिन यांनी अखेरच्या क्षणी दुसऱ्या गाडीतून जाण्याचा निर्णय घेतला. दारिआने गाडीत बसून ती सुरू केल्यावर जोराचा स्फोट झ्ााला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अलेक्झ्ाांडर दुगिन हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा ‘ब्रेन’ म्हणून ओळखण्यात येतात. ‘रशियन वर्ल्ड’ या संकल्पनेचा पुरस्कार करणाऱ्या दुगिन यांनी युक्रेनवरील हल्ल्याचे सातत्याने समर्थन केले होते

English हिंदी