जिनपिंग यांना चीनला जगातील पहिल्या क्रमांकाची सत्ता बनवायचे आहे – परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा आरोप

जिनपिंग यांना चीनला जगातील पहिल्या क्रमांकाची सत्ता बनवायचे आहे – परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा आरोप

वॉशिंग्टन – ‘चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी असलेल्या शी जिनपिंग यांनी त्यांचे इरादे उघड केले आहेत. त्यांना चीनवर संपूर्ण नियंत्रण हवे आहे आणि त्याचवेळी चीनला जगातील पहिल्या क्रमांकाची सत्ता बनवायचे आहे. ते आपल्या योजनेवर वेगाने काम करीत आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचे सामर्थ्य वाढविणे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचा चीनच्या फायद्यासाठी वापर करून घेणे त्याचाच भाग आहे’, असा खरमरीत आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला.

पहिल्या क्रमांकाची सत्ता, नियंत्रण, पीपल्स लिबरेशन आर्मी, डोनाल्ड ट्रम्प, कम्युनिस्ट पार्टी, व्यापारयुद्ध, चीन, अमेरिका, कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट, TWW, Third World War

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत चीनविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. तीन वर्षांपूर्वी चीनविरोधात व्यापारयुद्ध छेडणाऱ्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राजनैतिक संघर्षाची धार अधिक तीव्र केली. त्या अंतर्गत अमेरिकेचे वरिष्ठ मंत्री व अधिकारी चीनच्या सत्ताधारी राजवटीचा खरा चेहरा तसेच कारवायांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यात आघाडीवर असून, त्यांचे नवे वक्तव्यही चीनविरोधात सुरू असलेल्या राजनैतिक मोहिमेचाच भाग असल्याचे दिसत आहे.

पॉम्पिओ यांनी ‘जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये केलेल्या भाषणात, चीन कधीही अमेरिकेचे संशोधन व तंत्रज्ञान यांची बरोबरी करु शकणार नाही, असा टोला लगावला. ‘चीनने केलेल्या औद्योगिक प्रगतीचा पाया इतर देशांकडून चोरलेल्या तंत्रज्ञानावर आधारलेला आहे. काही प्रसंगांमध्ये आर्थिक बळ वापरून इतर देशांकडून तंत्रज्ञान खरेदी करण्यात आले आहे. चीनकडे त्यांच्या देशात विकसित झालेले तंत्रज्ञान नाही. अमेरिकेत शिकण्यासाठी आलेल्या चिनी संशोधकांवर मायदेशी येऊन समाजवादी राजवटीची सेवा करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे’, असा ठपका अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला.

पहिल्या क्रमांकाची सत्ता, नियंत्रण, पीपल्स लिबरेशन आर्मी, डोनाल्ड ट्रम्प, कम्युनिस्ट पार्टी, व्यापारयुद्ध, चीन, अमेरिका, कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट, TWW, Third World War

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून फक्त चिनी नागरिक व विद्यार्थ्यांवरच नाही तर अमेरिकी विद्यार्थ्यांवरही नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही पॉम्पिओ यांनी केला. चीनकडून अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये स्थापन झालेल्या ‘कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट’ त्याचेच उदाहरण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिनपिंग केवळ चिनी नागरिकांवरच नाही तर अमेरिकेतील प्रत्येकावर लक्ष ठेऊन असल्याचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी बजावले. गेल्या काही दिवसातील घटनांकडे पाहिले तर जिनपिंग आपला प्रभाव वाढविण्यासाठी काय व कशा प्रकारे हालचाली करीत आहेत, हे लक्षात येईल असेही पॉम्पिओ यांनी सांगितले.

अमेरिकेतील जनतेने चीनबाबत योग्य माहिती करून घेतली नाही आणि चीनच्या कारवायांबाबत सजगता दाखविली नाही तर पुढील काळात चीनची राजवट आपल्याला शिकवित असल्याचे चित्र दिसेल, असा इशाराही अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष आर्थिक बळ तसेच तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाने कधीही न पाहिलेली एकाधिकारशाही व दडपशाहीची राजवट राबवित आहे, असा आरोपही पॉम्पिओ यांनी केला.

गेल्याच महिन्यात परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी चीनची कम्युनिस्ट पार्टी हाच जगातील पहिल्या क्रमांकाचा धोका असल्याचे बजावले होते. त्याचवेळी येणाऱ्या दशकांमध्ये अमेरिकेला चीनच्या आव्हानाचा मुकाबला करावा लागणार आहे, याची जाणीवही त्यांनी करून दिली होती.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info