चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा प्रचार करणार्‍या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ची जपानकडून चौकशी

Confucius Institute

Confucius Institute

टोकिओ/बीजिंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा प्रचार करणार्‍या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ची चौकशी करण्याचा निर्णय जपानच्या सरकारने घेतला आहे. जपानचे शिक्षणमंत्री कोईची हगिउदा यांनी ही माहिती दिली. गेल्या काही वर्षात अमेरिका तसेच युरोपिय देशांनी चीनच्या राजवटीचा प्रचार करणार्‍या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर जपानमध्ये या संस्था अजून का कार्यरत आहेत, असे सवाल संसद सदस्यांकडून उपस्थित करण्यात आले होते.

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा प्रचार करणार्‍या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ची जपानकडून चौकशीचीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून त्यांच्या विचारसरणीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी इतर देशांमध्ये मोहीम राबविण्यात आली आहे. प्रसारमाध्यमे व शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून ही आक्रमक मोहीम राबविण्यात येत असून ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ त्याचा महत्त्वाचा भाग मानला जातो. चीनच्या राजवटीने 160हून अधिक देशांमध्ये 500हून अधिक ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूटस्’ची उभारणी केली आहे. या संस्थांच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराबरोबरच संबधित देशांमध्ये वास्तव्यास असणारे चिनी विद्यार्थी तसेच नागरिकांवर टेहळणी करण्यात येत असल्याचे दावे समोर आले आहेत. अमेरिकेत ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून तंत्रज्ञान तसेच बौद्धिक संपदा चोरण्याचे प्रयत्न झाल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व युरोपिय देशांनी ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’विरोधात मोहिम छेडली असून अनेक देशांमध्ये त्यावर बंदीचे संकेत देण्यात आले आहेत.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/japan-to-conduct-review-of-china-funded-confucius-institute/