रशियाने पूर्व व दक्षिण युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता वाढविली

युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता

मॉस्को/किव्ह – रशियाने पूर्व व दक्षिण युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. गेल्या 24 तासांमध्ये रशियन संरक्षणदलांनी खार्किव्हपासून ओडेसापर्यंतच्या भागातील युक्रेनी लष्कराच्या 400हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. मारिपोलमधील पोलाद फॅक्टरीवरही हल्ले चढविण्यात आले आहेत. डोन्बास क्षेत्रातील अनेक छोटी शहरे व गावांवर नियंत्रण मिळविण्यात रशियाला यश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रशियाची कारवाई अधिक तीव्र होत असतानाच युक्रेन शांतीचर्चेतून बाहेर पडेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिला आहे.

युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता

गेल्याच आठवड्यात रशियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी युक्रेन मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व व दक्षिण युक्रेनवर नियंत्रण मिळविण्याचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रशियन संरक्षणदलांनी खार्किव्हपासून ओडेसा शहरापर्यंतच्या क्षेत्रात आक्रमक आघाडी उघडली आहे. डोन्बासमधील अनेक शहरांमध्ये सातत्याने रॉकेटस्‌‍, क्षेपणास्त्रे व तोफांचे हल्ले सुरू आहेत. त्याचवेळी युक्रेनचा शस्त्रसाठा व मोठ्या तळांना लक्ष्य करण्यासाठी रशियाने ‘हाय प्रिसिजन मिसाईल्स’चा वापर वाढविला आहे.

युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता

गेल्या 24 तासांमध्ये रशियाने युक्रेनी लष्कराच्या 423 ठिकाणांना लक्ष्य केल्याची माहिती रशियन संरक्षणदलाने दिली. त्यात ओडेसा शहरातील ‘लॉजिस्टिक्स टर्मिनल’, खार्किव्हमधील चार शस्त्र कोठारे, 30 सशस्त्र वाहने व 26 कमांड पोस्टस्‌‍चा समावेश आहे. रशियाच्या हल्ल्यांमध्ये 200 युक्रेनी जवान ठार झाल्याचेही रशियन प्रवक्त्यांनी सांगितले. मारिपोलमधील युक्रेनी जवानांनी आश्रय घेतलेल्या स्टील फॅक्टरीच्या क्षेत्रातही रशियन लष्कराने हल्ले चढविले आहेत.

युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता

खार्किव्हजवळ असलेल्या इझियम तसेच पूर्व युक्रेनमधील हुलिआपोल शहरानजिक रशिया व युक्रेनच्या फौजांमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे सांगण्यात येते. नजिकच्या काळात पूर्व युक्रेनमधील हल्ल्यांची व्याप्ती अधिक वाढविण्याची तयारी रशियाने सुरू केली आहे. त्यासाठी युक्रेन सीमेनजिक असलेल्या बेलगोरोद भागात ‘इस्कंदर-एम’ क्षेपणास्त्रांची नवी युनिट्स तैनात करण्यात आली आहेत. रशियाच्या हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच युरोपिय देशांनी युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रपुरवठ्यातही मोठी वाढ केल्याचे उघड झाले.

युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता

पोलंडने युक्रेनला एक अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीची शस्त्रे पुरविल्याची माहिती दिली. पोलंडसह युरोपचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी हे सहाय्य दिल्याचा दावा पोलंडच्या प्रवक्त्यांनी केला. ब्रिटनने युक्रेनला ‘स्टारस्ट्रिक मिसाईल सिस्टिम’ तसेच ‘स्टॉर्मर’ या सशस्त्र वाहनांचा पुरवठा सुरू केला आहे. तर फ्रान्सने ‘मिलान मिसाईल्स’ व ‘सीझर हॉवित्झर्स’ युक्रेनला धाडण्यात येत असल्याचे जाहीर केले. याव्यतिरिक्त नेदरलॅण्डस्‌‍ने युक्रेनला ‘हेवी वेपनरी’ देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, रशियन मोहिमेची व्याप्ती वाढत असतानाच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी शांतीचर्चेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. मारिपोलच्या फॅक्टरीवर हल्ला व खेर्सनमध्ये सार्वमत घेण्याचा प्रयत्न झाल्यास युक्रेन शांतीचर्चेतून माघार घेईल, असे झेलेन्स्की यांनी बजावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info