युक्रेनमधील पिछेहाटीनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता

- अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा इशारा

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – युक्रेनमध्ये रशियाची पिछेहाट होत असताना दबावाखाली येऊन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन अण्वस्त्रहल्ला करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असा खळबळजनक इशारा अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी बिग्रेडिअर जनरल केविन रायन यांनी दिला. नाटोच्या माजी उपप्रमुख रोझ गॉटमोलर यांनीही याला दुजोरा दिला आहे. युक्रेनने दिलेल्या हादऱ्यानंतर त्यांनी रशियासमोर शरणागती पत्करावी यासाठी रशियाकडून अणुहल्ल्याचा पर्याय निवडला जाऊ शकतो, असे गॉटमोलर यांनी बजावले. दरम्यान, खार्किव्हपाठोपाठ दक्षिण युक्रेनमधील खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतातही युक्रेनी फौजांनी मोठे हल्ले चढविले असून झॅपोरिझिआ प्रांतातील मेलिटपोल शहरातून रशियन सैन्य माघार घेत असल्याचे दावे करण्यात आले आहेत.

पुतिन

गेल्या काही दिवसात ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह प्रांतात युक्रेनी फौजांना मोठे सामरिक यश मिळाल्याचे उघड झाले आहे. युक्रेनच्या फौजांनी इझियम शहरासह काही महत्त्वाची शहरे ताब्यात घेतल्याचा व युक्रेनचे लष्कर रशियन सीमेपासून काही किलोमीटर्सच्या अंतरावर पोहोचल्याची माहिती युक्रेनी नेत्यांनी दिली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, ईशान्य तसेच दक्षिण युक्रेनमधील आठ हजार चौरस किलोमीटर्सचे क्षेत्र पुन्हा ताब्यात घेतल्याचा दावाही केला. बुधवारी झेलेन्स्की यांनी युक्रेनी फौजांनी ताब्यात घेतलेल्या इझियम या शहराला भेटही दिल्याचे समोर आले आहे.

पुतिन

खार्किव्हमधील यशानंतर युक्रेनच्या लष्कराने डोन्बास भागाकडे मोर्चा वळविल्याचे सांगण्यात येते. डोन्बासमधील रशियाच्या ताब्यात असणाऱ्या भागांवर युक्रेनकडून हल्ले सुरू झाले आहेत. त्याचवेळी दक्षिण युक्रेनच्या खेर्सन व झॅपोरिझिआ या प्रांतातही युक्रेनी फौजांनी पुन्हा एकदा प्रतिहल्ल्यांची धार वाढविली आहे. युक्रेनचे लष्कर हळुहळू भाग ताब्यात घेत असून रशियन सैन्याचे मनोधैर्य खचल्याचे दावे करण्यात येत आहेत. झॅपोरिझिआमधील मेलिटपोल या महत्त्वाच्या शहरातून रशियन तुकड्यांनी माघार घेण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.

पुतिन

युक्रेनी सैन्याची आगेकूच व रशियाची होणारी पिछेहाट या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन ‘न्यूक्लिअर ऑप्शन’चा वापर करण्याची शक्यता वाढल्याचे इशारे देण्यात येत आहेत. रशियातील अमेरिकी दूतावासात ‘मिलिटरी ॲटॅचे’ म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या बिग्रेडिअर जनरल केविन रायन यांनी याबाबत गंभीर इशारा दिला. ‘काहीतरी नाट्यमय अथवा निर्णायक पाऊल उचलण्यासाठी पुतिन यांच्यावर दबाव असून तो वाढतो आहे. अशा स्थितीत ते अणुहल्ल्याचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे’, अशा शब्दात रायन यांनी अणुहल्ल्याच्या संभाव्यतेकडे लक्ष वेधले.

‘रशिया डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांताला आपल्यात सामील करण्याचे पाऊल उचलू शकतात. तसेच झाले तर सध्या सुरू असलेला संघर्ष रशियन हद्दीत चालू असल्याचे चित्र निर्माण होईल. या भागात नाटोच्या शस्त्रांचा वापर सुरू असल्याने रशियावर हल्ला सुरू असल्याचे दाखवून नाटोने रेड लाईन्स ओलांडल्याचा दावा करता येईल. ही बाब अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी कारणीभूत ठरु शकते’, या शब्दात अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी बजावले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info