रशियाने युक्रेनवरील हल्ल्यांची व्याप्ती वाढविली

- हस्तक्षेप करणाऱ्या देशांना रशियन राष्ट्राध्यक्षांकडून नवा इशारा

हल्ल्यांची व्याप्ती

मॉस्को/किव्ह – युक्रेनवरील लष्करी कारवाईचा दुसरा टप्पा सुरू केल्यानंतर रशियन हल्ल्यांची व्याप्ती दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये रशियन संरक्षणदलांनी युक्रेनी लष्कराच्या ठिकाणांवर 600हून अधिक हल्ले चढविले आहेत. यात परदेशी शस्त्रांचा साठा असणाऱ्या कोठारासह ड्रोन्स, मिसाईल लाँचर्स, रेल्वेमार्ग, पूल, रणगाडे तसेच सशस्त्र वाहनांचाही समावेश आहे. पूर्व युक्रेनमधील तीन शहरे व महत्त्वाचे भाग ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येते. हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, युक्रेनमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या देशांना खणखणीत प्रत्युत्तर मिळेल, असे बजावले आहे.

हल्ल्यांची व्याप्ती

रशियन संरक्षणदलांनी गेल्या आठवड्यात युक्रेनवरील लष्करी कारवाईचा दुसरा टप्पा सक्रिय केला होता. या टप्प्यात दर दिवशी रशियन हल्ल्यांची तीव्रता वाढताना दिसत आहे. रशियाची संरक्षणदले युक्रेनच्या लष्करी ठिकाणांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करीत आहेत. त्याचवेळी पूर्व व दक्षिण युक्रेनमधील शहरे व महत्त्वाचे भाग ताब्यात घेण्यातही रशियाला चांगले यश मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये रशियाने डोन्बास क्षेत्रातील दोन शहरांसह खार्किव्ह प्रांतातील भागांवर ताबा मिळविल्याचे उघड झाले.

हल्ल्यांची व्याप्ती

रशियन संरक्षणदलांनी 24 तासांच्या अवधीत 630हून अधिक युक्रेनी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. रशियन हवाईदलांनी सुमारे 60 जागांवर हल्ले चढविले आहेत. रशियन नौदलाकडून झॅपोरोझ्ये शहरातील मोठ्या शस्त्रागाराला लक्ष्य करण्यात आले. या शस्त्रागारात पाश्चिमात्य देशांनी पुरविलेली शस्त्रे ठेवण्यात आली होती. याव्यतिरिक्त युक्रेनच्या इतर भागांमधील आठ शस्त्र कोठारांवर हल्ले केल्याची माहिती रशियन संरक्षणदलांनी दिली. मारिपोलमधील स्टील फॅक्टरीवरही हल्ले चढविल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

हल्ल्यांची व्याप्ती

युक्रेन सीमेनजिक असलेल्या रशियन प्रांतांमध्येही हल्ले झाल्याचे समोर आले आहे. युक्रेनची ड्रोन्स तसेच लढाऊ विमाने रशियन प्रांतांना लक्ष्य करीत असल्याचे सांगण्यात येते. एका हल्ल्यात रशियातील इंधन डेपोला आग लागल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या देशांना नवा इशारा दिला आहे.

कोणत्याही देशाने युक्रेनमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तातडीने व खणखणीत प्रत्युत्तर मिळेल, असे पुतिन यांनी बजावले. रशियाच्या सामरिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास काय कारवाई करायची याची योजना आधीच तयार असल्याचेही रशियन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info