रशियाने वेढलेल्या बाखमतमधून युक्रेनच्या लष्कराने माघार घ्यावी

- ‘वॅग्नर ग्रुप’च्या प्रमुखांचा इशारा

मॉस्को/किव्ह – ‘रशियन फौजा व वॅग्नर ग्रुपच्या तुकड्यांनी बाखमतला पूर्णपणे वेढा घातला आहे. फक्त एकच मार्ग मोकळा राहिला आहे. युक्रेनचे सैन्य बाखमतमध्ये संघर्ष करीत आहे. पण त्यांच्याकडे आता जेमतेम एक किंवा दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या कालावधीत त्यांना शहर सोडण्याची संधी मिळू शकते’, असा इशारा रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी दिला. हा इशारा समोर येत असतानाच युक्रेनी लष्कराच्या ड्रोन विभागाचा हिस्सा असणाऱ्या तुकडीला बाखमतमधून बाहेर पडण्याचे निर्देश दिल्याची माहिती सोशल मीडियातून उघड झाली आहे.

बाखमतमधून

गेल्या काही महिन्यांपासून बाखमतमध्ये संघर्ष करणाऱ्या रशियन लष्कराने नवीन वर्षात त्याला प्राधान्य दिले होते. नव्या लष्करी तुकड्या व मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री तैनात करण्यात आली होती. बाखमतनजिकचे भाग टप्प्याटप्प्याने काबीज करण्यावर भर देण्यात आला होता. युक्रेनी लष्कराचा प्रतिकार मोडून काढत रशियाने या भागात आगेकूच करण्यात यश मिळविले होते. बाखमतमधील परिस्थिती कठीण झाल्याचे मान्य करणाऱ्या युक्रेनी नेतृत्त्वाने त्या भागातून माघार घेण्यास टाळाटाळ केली होती. मात्र रशियाच्या प्रखर हल्ल्यांपुढे युक्रेनी लष्कराचा प्रतिकार कमी पडल्याचे बाखमतच्या घटनेवरून दिसून येत आहे.

रशियन लष्कर व वॅग्नर ग्रुपने बाखमतमधील युक्रेनी फौजेभोवतीचा वेढा अधिकच आवळला असून शहरातील मध्यवर्ती क्षेत्र वगळता बहुतांश भागांवर रशियाने नियंत्रण मिळविले आहे. बाखमतमध्ये जवळपास तीन हजार युक्रेनी जवान अजूनही तैनात असल्याचे मानले जाते. डोन्बासमधील सामरिकदृष्ट्या निर्णायक शहर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या बाखमतवर ताबा मिळविल्यानंतर रशियन फौजा डोनेत्स्क, खार्किव्ह तसेच मध्य युक्रेनमध्ये अधिक आक्रमक हल्ले चढवतील, असे सांगण्यात येते.

बाखमतमधून

यापूर्वी खार्किव्ह व खेर्सनमधील मोहिमेदरम्यान रशियन लष्कराला ताब्यात असलेला काही भाग गमावणे भाग पडले होते. मात्र डोन्बासमधील संघर्षात रशियाने कोणतेही महत्त्वाचे शहर अथवा भाग गमावलेला नाही. उलट बाखमतसाठी हळुहळू पावले उचलत शहराभोवतालचा वेढा घट्ट करण्यात यश मिळविल्याचे दिसते. रशियन माध्यमे व सोशल मीडियावर बाखमतच्या लढाईची तुलना दुसऱ्या महायुद्धातील ‘बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड’शी करण्यात येत आहेत. हे लक्षात घेता रशियाच्या मोहिमेतील बाखमतचे महत्त्व ठळकपणे समोर येते.

बाखमतबरोबरच रशियाने पूर्व युक्रेनमधील सर्व आघाड्यांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. बाखमतसह कुपिआन्स्क, लिमन, वहलेदर या शहरांवर सातत्याने व प्रखर हल्ले सुरू आहेत. युक्रेनी यंत्रणांनी कुपिआन्स्कमधील नागरिकांना शहर सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. बाखमतजवळ असलेल्या चॅसिव यार या शहरावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तोफा व रॉकेटस्‌‍चा मारा सुरू आहे. रशिया बाखमतनंतर या शहराला लक्ष्य करील असे दावेही करण्यात येत आहेत.

English       हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info